शेतकरी मित्रांनो आणि लाभार्थी महिलांनो, मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबद्दल काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर माहिती या लेखातून मिळणार आहे. या योजनेतील अटी-शर्तींमध्ये कोणताही बदल झालेला नाही, याबाबत स्पष्टता देण्यात आली आहे. समाजमाध्यमांवर या योजनेविषयी चुकीची माहिती प्रसारित होत असल्याने लाभार्थ्यांमध्ये गैरसमज निर्माण होत आहेत. या लेखात योजनेच्या सद्यस्थिती, अटी-शर्ती, आणि सोलापूर जिल्हा व पुणे जिल्ह्यातील नोटिसांवरील मुद्दे समजावून सांगितले आहेत.
योजनेच्या अटी-शर्ती कायम तशाच आहेत
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अटी-शर्ती किंवा निकषांमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाही. ज्या लाभार्थ्यांनी योजनेसाठी अर्ज केले आहेत, त्यांना अर्ज करताना दिलेल्या अटी लागू राहणार आहेत. समाजमाध्यमांवर रिल्स किंवा व्हिडिओच्या माध्यमातून चुकीची माहिती प्रसारित होत असल्याने गैरसमज पसरले आहेत. पण प्रशासनाने याबाबत स्पष्ट केले आहे की, कोणताही बदल असल्यास तो अधिकृतरित्या जाहीर केला जाईल.
![](https://ancagri.in/wp-content/uploads/2024/12/20241213_140250-1024x573.jpg)
पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील नोटिसांचे महत्व
एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालय, पुणे जिल्हा परिषद आणि सोलापूर जिल्हा अंतर्गत नोटिसा काढण्यात आल्या आहेत. या नोटिसांमध्ये असे नमूद केले आहे की, लाभार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. दोन्ही ठिकाणी सांगितले गेले आहे की, योजनेचे निकष जसेच्या तसे आहेत. अंगणवाडी सेविकांमार्फत या योजनेची सध्यस्थिती जनतेच्या निदर्शनास आणून देण्यात यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
चुकीच्या बातम्यांमुळे गैरसमज टाळण्याचे आवाहन
चुकीच्या माहितीमुळे लाभार्थ्यांच्या मनात कोणतेही गैरसमज निर्माण होऊ नयेत, म्हणून प्रशासनाने विशेष सूचना दिल्या आहेत. या योजनेच्या सद्यस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. ज्या लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत पैसे मिळत आहेत, त्यांना नियमित हफ्ते मिळत राहतील. कोणताही अतिरिक्त अर्ज करण्याची किंवा प्रक्रिया पूर्ण करण्याची गरज नाही.