

कृषि महाविद्यालयात सेंद्रिय शेती प्रशिक्षण
भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाअंतर्गत ,राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान मोहिमेच्या ग्रामीण युवकांना कौशल्य आधारित प्रशिक्षण कार्यक्रम ” सेंद्रिय शेती ” या विषयावर महारोगी सेवा समिती वरोरा द्वारा संचालित आंनद निकेतन कृषी महाविद्यालय, वरोरा जि. चंद्रपुर येथे दि. 08 ते 13/10/2022या कालावधीत प्रशिक्षण आयोजीत केले होते.
आनंद निकेतन कृषी महाविद्यालय वरोरा, राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था हैद्राबाद (मॅनेज), वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था, नागपूर (वनामती) तथा कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, चंद्रपूर (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने सदर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रशिक्षणाचे उद्घाटन दिनांक 08 ऑक्टोबर 2022 रोजी महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले. उद्घाटक म्हणुन डॉ ए.एन.पसलावार, विभाग प्रमुख, कृषीविद्या विभाग, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. एन.के.पतकी, विभाग प्रमुख, नागार्जुना वनौषधी उद्यान, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला, आनंदवनचे विश्वस्त श्री सुधाकर कडू व अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एस.पोतदार उपस्थित होते.
या प्रशिक्षणामध्ये ग्रामीण उद्योजकांसाठी सेंद्रिय शेती, सेंद्रिय शेतीमध्ये वनऔषधी लागवड, सेंद्रिय शेतीची संकल्पना,महत्व व व्यवस्थापन, सेंद्रिय शेतीमध्ये सेंद्रिय निविष्ठांचे महत्तव व उत्पादन पध्दती, माती परीक्षण, हिरवळीचे खते, सेंद्रिय पध्दतीने फळ पिकांची व भाजीपाला लागवड, ॲझोला उत्पादन, सेंद्रिय कर्ब वाढविण्याच्या उपाययोजना, सेंद्रिय पध्दतीने किड व रोग व्यवस्थापन, सेंद्रिय शेती प्रमाणीकरण, विपणन व योजना, प्रक्षत्र व प्रयोगशाळा भेट इत्यादीची माहिती देण्यात आली.
समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 13 ऑक्टोंबर 2022 रोजी महाविद्यालयात करण्यात आले होते. कार्यक्रमाला डॉ. व्हि.के.खडसे, विस्तार विद्यावेत्ता, कृषी महाविद्यालय, नागपुर, श्री गजानन भोयर, तालुका कृषी अधिकारी, वरोरा सौ. एच.एस.पोतदार, प्राचार्य, आनंदवन कृषी तंत्र विद्यालय, वरोरा उपस्थित होते. अध्यक्ष स्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एस. पोतदार यांनी भूषविले. प्रास्ताविक डॉ. एस. आर. इमडे यांनी केले. संचालन डॉ. आर. व्ही. महाजन यांनी तर आभार डॉ. व्ही. व्ही. पाटील यांनी मानले.