मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना! नवीन अर्ज, अपात्रता, हप्ते आणि ई-केवायसीबाबत सविस्तर अपडेट

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची महिलांसाठी अतिशय महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये आर्थिक मदत दिली जाते. सध्या या योजनेबाबत महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. नवीन अर्ज करता येतील का, पूर्वी लाभ घेऊन नंतर अपात्र ठरलेल्या महिलांना पुन्हा लाभ मिळेल का, आतापर्यंत किती हप्ते मिळाले आहेत, पुढील हप्ता कधी येणार आहे आणि ई-केवायसी न केल्यास काय परिणाम होतील, या सर्व मुद्द्यांवर सविस्तर आणि स्पष्ट माहिती या लेखामध्ये दिली आहे. त्यामुळे लेख शेवटपर्यंत नीट वाचा.

आतापर्यंत मिळालेले हप्ते आणि लाभाची स्थिती

  • पात्र महिलांना 16 हप्ते जमा

  • दर महिना 1500 रुपयांचा लाभ

  • थेट बँक खात्यात पैसे जमा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिला पात्र ठरल्या आहेत, त्यांच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत एकूण 16 हप्ते जमा झाले आहेत. प्रत्येक हप्ता 1500 रुपयांचा असल्यामुळे महिलांना मोठा आर्थिक आधार मिळत आहे. हा लाभ थेट DBT पद्धतीने म्हणजेच थेट बँक खात्यात जमा केला जातो. त्यामुळे कोणत्याही एजंटची किंवा मध्यस्थाची गरज लागत नाही. अनेक महिलांनी कमेंट्स आणि व्हॉट्सॲप संदेशांद्वारे सांगितले आहे की या योजनेमुळे घरखर्च, औषधोपचार आणि लहान गरजांसाठी मोठी मदत होत आहे.

 

17वा हप्ता उशिरा का येतोय?

  • आचारसंहितेमुळे विलंब

  • हप्ता बंद झालेला नाही

  • लवकरच जमा होण्याची शक्यता

सध्या अनेक महिलांना वाटत आहे की 17वा हप्ता बंद झाला आहे किंवा येणार नाही. मात्र तसे अजिबात नाही. राज्यात लागू असलेल्या आचारसंहितेमुळे हप्त्याच्या वितरणास थोडा विलंब झाला आहे. त्यामुळे पैसे थोडे उशिरा येत आहेत. सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार, 17वा हप्ता लवकरच पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होऊ शकतो. त्यामुळे पात्र महिलांनी घाबरून जाण्याची गरज नाही. थोडा वेळ लागला तरी हप्ता नक्की मिळेल.

 

नवीन महिलांना अर्ज करता येणार आहेत का?

  • सध्या नवीन अर्ज बंद

  • ऑनलाइन आणि ऑफलाइन सुविधा नाही

  • अंगणवाडीतही अर्ज होत नाही

ज्या महिलांनी पूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अर्ज केला नाही, त्या महिलांना आता अर्ज करता येईल का, हा प्रश्न सर्वाधिक विचारला जात आहे. सध्याच्या स्थितीत याचे स्पष्ट उत्तर म्हणजे नाही. सध्या नवीन अर्ज करण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. ऑनलाइन पोर्टलवरून अर्ज करता येत नाहीत. ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात नाहीत. अंगणवाडी केंद्रात सुद्धा नवीन अर्ज घेतले जात नाहीत. म्हणजेच सध्या लाडकी बहीण योजनेचे नवीन अर्ज पूर्णपणे बंद आहेत.

 

अपात्र ठरलेल्या महिलांना पुन्हा अर्ज करता येईल का?

  • डबल अर्जाची परवानगी नाही

  • एकदाच अर्जाची संधी

  • काही महिलांना अपात्र घोषित केले

अनेक महिलांनी आधी अर्ज केला होता. त्यांना काही हप्ते सुद्धा मिळाले होते. मात्र नंतर काही कारणांमुळे त्या महिला अपात्र ठरल्या. अशा महिलांना पुन्हा अर्ज करता येईल का, हा प्रश्नही महत्त्वाचा आहे. सध्या योजनेच्या नियमांनुसार डबल अर्ज करता येत नाही. प्रत्येक महिलेला फक्त एकदाच अर्ज करण्याची संधी देण्यात आली होती. त्यामुळे पुन्हा नवीन अर्ज करता येणार नाही. योजनेतून काही महिला कट झाल्या आहेत. त्यामागे एकूण सात कारणे आहेत. या सात कारणांची सविस्तर माहिती यापूर्वी आमच्या चॅनलच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

 

ई-केवायसी अनिवार्य – अंतिम तारीख 31 डिसेंबर

  • ई-केवायसी बंधनकारक

  • 31 डिसेंबर अंतिम तारीख

  • केवायसी न केल्यास हप्ता बंद

राज्य सरकारकडून वारंवार सांगण्यात येत आहे की लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. ज्या महिलांनी अद्याप ई-केवायसी केली नसेल, त्यांनी 31 डिसेंबरच्या आत नक्की करून घ्यावी. जर ई-केवायसी वेळेत केली नाही, तर जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यापासून हप्ता मिळणार नाही. फक्त ज्या महिलांची ई-केवायसी पूर्ण आहे, त्यांनाच पुढील हप्ते मिळणार आहेत. त्यामुळे ही बाब अतिशय गंभीरपणे घ्या.

 

पुढील अपडेट कधी आणि कुठे मिळेल?

  • नवीन अर्ज सुरू झाल्यास माहिती दिली जाईल

  • अधिकृत अपडेटची वाट पहा

  • जास्तीत जास्त महिलांपर्यंत माहिती पोहोचवा

भविष्यात जेव्हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नवीन अर्ज सुरू होतील, तेव्हा सर्वात आधी त्याची माहिती देण्यात येईल. याआधी ज्या पद्धतीने माहिती दिली गेली होती, त्याच पद्धतीने अनेक महिलांनी मोबाईलवरून अर्ज केले आणि त्या पात्र ठरून लाभ घेत आहेत. ही माहिती महत्त्वाची असल्यामुळे जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा. तुम्ही पहिल्यांदाच हा लेख वाचत असाल तर धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह.
जय हिंद, जय महाराष्ट्र.

Leave a Comment